Monday, July 13, 2015

How to Make Tasty Malvani Fish-curry

Malvani Fish Curry - Image source: Youtube.com
One of the tastiest Konkani or Malvani menus is the Malvani fish curry. This mouthwatering curry is famous not only in Konkan and Maharashtra but also in other states and even abroad. Once you will taste this hot and spicy dish, you will never forget its heavenly taste. So let’s see how to make the Malvani fish curry in this article.

Ingredients:
  • About ½ kg fish of your choice such as Pomfret (Paplet), Mackerel (Bangda ), King Mackerel (Surmai), Indian Salmon (Rawas), Prawns, etc.
  • 1 medium size onion (finely chopped)
  • 3-4 cloves
  • 2-3 green chilies
  • 2 teaspoon green masala
  • 1 grated coconut
  • 5-6 whole kokum or tamarind (chinch) juice in water
  • 2 teaspoon coriander seeds (dhane)
  • ½ teaspoon turmeric powder
  • 4-5 triphal (a special Konkani spice)
  • Coriander leaves
  • Lemon
  • 2-3 tablespoon oil

Recipe:
  1. Clean the fish and make medium sized pieces and apply some lemon juice on them
  2. Grind the grated coconut, turmeric powder, coriander seeds, green masala with water in a mixer
  3. Heat the oil in a pot/pan and fry chopped onions and cloves in it
  4. Once the onion becomes golden-brown, add the grounded mixture and pieces of fish into it and lightly stir.
  5. Add 3-4 cups of water and bring the mixture to a boil on medium flame
  6. Add kokam/tamarind juice, green chili pieces and trifal and stir lightly and cook for some time on a medium to light flame
  7. Add salt to taste and some red chili power as required.
  8. Garnish with coriander leaves and serve hot with rice, chapattis or rotis.
So when you will prepare Malvani fish curry next time, do remember us! And do write your experience in the comments section below.



( आमच्या मराठमोळ्या वाचकांसाठी वरील रेसिपी खास मराठीतून... )

लज्जतदार आणि चविष्ट मालवणी फिश-करी ( मच्छी-कढी )!


मालवणी फिश-करी किंवा मच्छी-कढी हि कोकणातील एक अतिशय लज्जतदार डिश. ‘मालवणचे कालवण’ केवळ कोकण आणि महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशातही प्रसिद्ध आहे. एकदा चाखलेत तर त्याची झणझणीत मसालेदार चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहिल्याशिवाय राहणार नाही. हा चविष्ट मेनू कसा बनवतात ते आपण या लेखात पाहूया.

साहित्य:
  • अर्धा किलो मासे - पापलेट, सुरमई, बांगडा, रावस, सवंदाळे, चिंगुळ (कोलंबी), ई. तुमच्या आवडीनुसार
  • मध्यम आकाराचा कांदा
  • लसणीच्या ३-४ पाकळ्या
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे हिरवा मसाला
  • १ किसलेला नारळ ( खोबरे )
  • ५-६ कोकम किंवा चिंच पाण्यात कुस्करून केलेला रस
  • २ चमचे धणे
  • अर्धा चमचा हळद
  • ४-५ त्रिफळे
  • कोथिंबीर
  • लिंबू
  • २-३ चमचे तेल
कृती:
  1. सर्वप्रथम मासे व्यवस्थित स्वच्छ करून त्यांचे योग्य आकाराचे तुकडे करून त्यांना लिंबाचा रस लावून ठेवावा.
  2. किसलेले खोबरे, हळद, धणे, हिरवा मसाला व थोडे पाणी मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावे.
  3. भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि लसणीची फोडणी तयार करावी.
  4. कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये वाटप आणि मासे घालून परतून घ्यावे.
  5. त्यामध्ये ३-४ कप पाणी घालून झाकण घालून मध्यम आचेवर ठेवून एक उकळी काढावी.
  6. कोकम/चिंचेचा रस, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व त्रिफळे टाकून मंद विस्तवावर शिजवावे.
  7. चवीनुसार मीठ, गरज वाटल्यास थोडे लाल तिखट घालावे
  8. वरून कोथिंबीर घालुन भात आणि चपाती किंवा रोटी बरोबर गरमागरम सर्व करावी.
पुढल्या वेळी जेव्हा मालवणी फिश-करी बनवाल तेव्हा आमची आठवण नक्की काढा. आणि तुमचे अनुभव खाली कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा.

No comments:

Post a Comment